Tue, Nov 13, 2018 06:36होमपेज › Konkan › कोकण रेल्वे मार्गावर २६ पासून ‘विंटर स्पेशल’

कोकण रेल्वे मार्गावर २६ पासून ‘विंटर स्पेशल’

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 10:37PM

बुकमार्क करा

रत्नागिरी :

कोकण रेल्वे मार्गावर  ‘विंटर स्पेशल’ गाडी जाहीर करण्यात आली आहे. पुणे - मंगळूरदरम्यान ही गाडी दि. 26 डिसेंबरपासून धावणार आहे. ही गाडी (01301/01302)  दि. 26 डिसेंबर ते दि. 2 जानेवारी 2018 या कालावधीत  आठवड्यातून एकदा धावाणार आहे. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थीवी, मडगाव, कारवार, कुमठा, कुंदापूर, उडूपी तसेच मुलकी या स्थानकांवर थांबे घेत तिचा प्रवास मंगळूर जंक्शनवर संपणार आहे.