Sat, Feb 16, 2019 14:57होमपेज › Konkan › अठरा स्वयंचलित हवामान केंद्रे !

अठरा स्वयंचलित हवामान केंद्रे !

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:40PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात 18 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी नव्याने 12 महसूल मंडलांमध्ये ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. एकूण 39 महसूल मंडलांपैकी 33 महसूल मंडलांच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 

तीन ते सहा डिसेंबर या कालावधीत कोकण किनारपट्टी भागात आलेल्या ‘ओखी’ वादळामुळे ही स्वयंचलित हवामान केंद्रे  उपयुक्त ठरली होती. स्थानिक ठिकाणाचे हवामान आणि त्यात होणारे बदल याचा वेध अचूकतेने घेताना शेतकर्‍यांसह आंबा बागायतदरांना ही केंद्रे  मार्गदर्शक ठरत होती. 2012 मध्ये  ‘स्कायमेट’ हवामान सेवा या खासगी संस्थेच्या माध्यमातून ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार होती. 

अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील ‘सेतू’ कार्यालयासमोरही या केंद्राची कार्यप्रणाली सुरू झाली. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात पाच ठिकाणी चिपळूण आणि राजापूर तालुक्यांत प्रत्येकी दोन आणि संगमेश्‍वर तालुक्यात तीन अशी 12 हवामान केंद्रे नव्याने सुरू करण्यात येणार आहेत.