Mon, Jun 24, 2019 21:59होमपेज › Konkan › जिल्ह्यात धरण क्षेत्रात 85 टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात धरण क्षेत्रात 85 टक्के पाणीसाठा

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 10:02PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाने जोरदार सक्रियता दाखविल्याने जुलैच्या पहिल्या पंधरावड्यातच जिल्ह्यातील 28 धरणे 100 टक्के भरली आहेत, तर 16 धरणे येत्या काही दिवसांत ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत 20 हजार मि. मी.ची मजल मारली असून, प्रमुख नद्यांनीही धोका पातळी गाठली होती. त्यामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. 

आतापर्यंत सरासरी दोन हजार मि.मी.चा टप्पा ओलांडताना पावसाने 60 टक्क्यांहून जास्त वाटचाल पूर्ण केली आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्यात 3, दापोलीत 4, खेडमध्येे 3, गुहागर तालुक्यात 1,  चिपळुणात 8, संगमेश्‍वर तालुक्यात 4, रत्नागिरी 1, लांजात 9 आणि राजापूर तालुक्यात 6 धरणे 100 टक्के भरली आहेत.  तर  16 धरणे 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरली असून काही दिवसांत ही धरणेही ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहे. अशी माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. 

100 टक्के भरलेली धरणे

मंडणगड- पणदेरी, चिंचाळी, मुळशी, दापोली-  सोंडेघर, सुकोंडी, आऴाशी, पंचनदी, खेड- शिरवली, शेलडी, कुरवळ, गुहागर- गुहागर, चिपळूण - तिवरे, मालघर, कळंबडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतकोल, असुर्डे, संगमेश्‍वर- तेलेवाडी, कडवई, निवे, रांगव, रत्नागिरी- शीळ, लांजा- शिपोशी, व्हेळ, गवाणे, ढापडे, बेणी,  मुचकुंदी, पन्हाळे, हर्दखळे, इंदवटी राजापूर ः अर्जुना (मध्यम प्रकल्प),  बारेवाडी, ओझर, चिंचवाडी,  गोपाळवाडी, वाटूळ.