Wed, May 22, 2019 16:45होमपेज › Konkan › रत्नागिरी शहरात ४८ टन कचरा गोळा

रत्नागिरी शहरात ४८ टन कचरा गोळा

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 9:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पद्म पुरस्कार सन्मानित स्वच्छतादूत डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानानिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. शहर परिसरातून तब्बल 48 टन कचरा गोळा करण्यात आला.

सकाळी 7 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत हे अभियान राबवले. यामध्ये 1370 श्री सदस्यांनी चोख कामगिरी बजावली. 10 शासकीय कार्यालयांच्या आवारामध्ये अभियानास सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, एसटी स्टँड, जिल्हा सत्र न्यायालय, तहसीलदार कार्यालय, रेल्वेस्थानक, जिल्हा शासकीय रुग्णालय, आरटीओ कार्यालय, पोलिस मुख्यालय, दारुबंदी कार्यालय येथे अभियान राबवले. तसेच मारुती मंदिर ते आठवडा बाजार व नाचणे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा मोहीम राबवली.

त्या त्या शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी, पोलिसांनीही हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. प्लास्टिक पिशव्या, ओला कचरा, सुकलेल्या झाडाच्या फांद्या, पाने, काचेच्या बाटल्या आदी कचर्‍याचे वर्गीकरण केले. ओला व सुका कचरा डंपिंग ग्राउंडवर श्री सदस्यांच्या वाहनांतून पोहोचवण्यात आला.

या अभियानामध्ये हजारो हात स्वच्छतेच्या कामात गुंतले. स्वच्छतेवेळी ओल्या व सुक्या कचर्‍याचे मूल्यमापन करण्यात आले. जमा झालेला कचरा व्यवस्थेनुसार पोहोचवण्यात आला. कचरा वाहतुकीसाठी श्री सदस्यांनी आपली वाहने आणली होती.