Wed, Aug 21, 2019 19:19होमपेज › Konkan › ‘बंद’मुळे जिल्ह्यात तणाव

‘बंद’मुळे जिल्ह्यात तणाव

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:34PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी पुकारलेला महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात संयमी आणि तणावपूर्ण वातावरणात प्रतिसाद मिळाला. चिपळूण तालुक्यात मात्र हिंसक वळण लागून बंदला गालबोट लागले. लांजा, संगमेश्‍वर, खेड आणि दापोली तालक्यांसह मंडणगड तालुक्यातही स्थिती तणावपूर्ण होती. मात्र, कोणताही अनुचित प्रकार न घडता बंदला शांततेत आणि संयमी वाातावरणात संमिश्र प्रतिसाद लाभला. रत्नागिरी शहराच्या अनेक भागांत आंंदोलकांनी गाड्या अडवून रास्ता रोको केला तर बाजारपेठेतील काही दुकाने बंद केली. मात्र, त्याचा परिणाम दीर्घकाळ न राहता वाहतुकीसह जनजीवन तणावपूर्ण वातावरणात सुरळीत सुरू होते. 

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद जिल्ह्यात बुधवारी संमिश्रपणे यशस्वी झाला. सकाळी 9 वा. येथील शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. काही वेळाने आंदोलकांनी न. प. प्रशासनाची वाहने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांनी  जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील चौकात निदर्शने केली. तेथील वाहतूक रोखण्याचाही प्रयत्न केला. या दरम्यान या भागातील काही दुकानेही बंंद करण्याचा  आंदोलकांनी प्रयत्न केला. दुकान मालकांनीही स्थितीचे गांभीर्य ओळखून काही काळ दुकाने बंद केली.