Fri, Apr 26, 2019 03:31होमपेज › Konkan › लाचखोर कोषागार लिपिकाला चार वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा

लाचखोर कोषागार लिपिकाला चार वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:24PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

तीन वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाल्यानंतर वारस म्हणून पत्नीच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ कोषागार लिपिक सुरेश नारायण चव्हाण (वय 40, रा. शासकीय निवासस्थान बिल्डिंग नं. 2, रूम नं. 11, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडले होते. सोमवारी या खटल्याचा  न्यायालयाने निकाल दिला.  यामध्ये लिपिकाला दोषी ठरवून 4 वर्षे सक्‍तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लाईफ टाईम अ‍ॅरियर्स प्रमाणपत्र देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच सुरेश चव्हाण याने मागितली होती. याबाबत रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2014 रोजी या विभागाच्या पथकाने कोषागार कार्यालय, रत्नागिरी येथे सापळा लावला होता. हा खटला न्यायालयात सुरू होता. सोमवारी निकाल देताना न्यायालयाने चव्हाण याने लाचेची मागणी करणे, तसेच ती पंचांसमक्ष स्वीकारून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन करणे या दोन्ही कलमांतर्गत दोषी ठरवत 4 वर्षे सक्‍तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विनय गांधी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. तसेच खटल्याच्या कामकाजात लाचलुचपतच विभागाचे पोलिस नाईक नंदकिशोर भागवत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.