होमपेज › Konkan › कर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’

कर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





रत्नागिरी : प्रतिनिधी

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या कर्जमाफीची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष कर्जमाफी  अजूनही कागदावरच आहे. कागदावर 61 हजार 144  शेतकर्‍यांची कर्जमाफी यादी  तयार करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कर्जमाफी ही ‘ग्रीन लिस्ट’मधील 14 हजार शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. यलो आणि  रेड लिस्टमधील ऑनलाईन घोळ अद्याप संपलेला नसल्याने कर्जमाफीची मुदत संपली तरी कर्जमाफीचा गोंधळ मागील पानावरून पुढे सुरूच आहे. 

‘छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजने अंतर्गत जिल्ह्यातील 61 हजार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार होता. त्यांपैकी 45 हजार शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. दुसरी यादी दुसर्‍या टप्प्यात जाहीर झाली. यामध्ये  16 हजार शेेतकर्‍यांचा समावेश  होता. त्यापैकी त्रुटी असलेल्या प्रस्तावांची छाननी ऑनलाईन सुरु होती.