Fri, Apr 26, 2019 15:38होमपेज › Konkan › कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 10:05PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या मागे बसलेला मित्र जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 27 एप्रिल रोजी सकाळी तळेकांटे (ता. संगमेश्‍वर) येथे घडली आहे.

विजय रामचंद्र झोरे (30, रा. तळेवाडी-चांदोर, ता. रत्नागिरी) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विश्‍वनाथ काशीराम जुवळे (26, रा. खेड) असे या अपघातात जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव आहे. विजय आणि विश्‍वनाथ हे दोघे नोकरीनिमित्त  मुंबईला असतात. शुक्रवारी पहाटे ते दोघेही दुचाकी (एमएच 48/ एव्ही 1517) घेऊन मुंबईहून रत्नागिरीकडे निघाले होते. ते तळेकांटे येथे आले असता अज्ञात कारने त्यांना धडक दिली. या अपघातात विजयचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. 

दोघांनाही नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. विश्‍वनाथला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा उतरीय तपासणी करुन विजयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.