Sat, Feb 16, 2019 18:52होमपेज › Konkan › रत्नागिरी केंद्रातून ‘कॅप्टन...कॅप्टन’ प्रथम

रत्नागिरी केंद्रातून ‘कॅप्टन...कॅप्टन’ प्रथम

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:35PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

57 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय, रत्नागिरी या संस्थेच्या ‘कॅप्टन...कॅप्टन’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. कलावलय, वेंगुर्ला या संस्थेच्या ‘निखारे’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. 

दि. 6 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे झालेल्या प्राथमिक फेरीत 15 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.साईकला क्रीडा मंच, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘अशुद्ध बीजापोटी’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक मनोहर सुर्वे (नाटक : कॅप्टन...कॅप्टन), द्वितीय पारितोषिक संजीव पुनाळेकर (नाटक : निखारे), प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक संजय तोडणकर (कॅप्टन... कॅप्टन), द्वितीय पारितोषिक स्वानंद सामंत (निखारे), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रवीण धुमक (कॅप्टन... कॅप्टन), द्वितीय पारितोषिक सचिन गोताड (ती रात्र), रंगभूषा : प्रथम पारितोषिक रजनीकांत कदम (अशुद्ध बीजापोटी), द्वितीय पारितोषिक किशोर कदम (भावीण), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ओंकार पाटील (कॅप्टन कॅप्टन) व सानिका कुंटे (अशुद्ध बीजापोटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अंकिता नाईक (भावीण), रुपाली परब (बिकट वाट वहिवाट), पल्लवी माळवदे (भावीण), सुलेखा डुबळे (अशुद्ध बीजापोटी), प्रसाद खानोलकर (निखारे), केदार देसाई (अशुद्ध बीजापोटी), रवींद्र रेपाळ (कोर्ट मार्शल), महेश पाखरे (कुणीतरी आहे तिथं).