Wed, Mar 27, 2019 04:03होमपेज › Konkan › शिकारीसाठी लावलेला बॉम्ब बैलाच्या तोंडात फुटला (व्हिडिओ)

शिकारीसाठी लावलेला बॉम्ब बैलाच्या तोंडात फुटला (व्हिडिओ)

Published On: Feb 05 2018 6:10PM | Last Updated: Feb 05 2018 6:11PMगिमवी : लक्ष्मीकांत घोणसेपाटील 

रत्नागिरीत आजही वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याची घटना समोर आली आहे. गुहागर तालुक्यातील झोंबडी गावात डूकराला मारण्यासाठी गावठी बाँम्ब तयार करण्यात आला होता मात्र हा बाँम्ब एका बैलानं खाल्यानं बैलाच्या तोंडातचं बाँम्बचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बैलाच्या जबड्याला गभीर इजा झाली आहे.

एकीकडे वन्यजीवांच्या संरक्षणाचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे  वन्य जीवांच्या शिकारीच्या घटना सर्रासपणे सुरू आसल्याचे समोर येत असते. रत्नागिरीतील  गुहागर तालुक्यातील झोंबडी गावात डुकराच्या शिकारीसाठी लावण्यात आलेला गावठी बाँम्ब एका बैलाने खाल्लाने बैलाच्या तोंडात बाँम्बचा स्फोट झाला. यात बैलाच्या तोंडाचा जबडा फाटला असून, बैलाच्या तोंडाला गंभीर इजा झाली आहे. कोकणातील अनेक भागात अशा पद्धतीन शिकार केली जाते अशा प्रकारामुळे पाळीव जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

अशा घटना सर्रास सुरू असल्याने पोलीस आणि वनविभागने आता याकडे गांभिर्यानं लक्ष देण गरजेचं असून, यावर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे मत  नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी गुहागरमधील निगुंडळ येथे गायीने अशाप्रकारचा गावठी बाँम्ब खाल्ला होता. ज्यात त्या गायीचा जबडा फाटून तीचा मृत्यू झाला होता. तेव्हा अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आणि वन विभाग पावले उचलणार का असा सवाल ग्रामस्थातून विचारण्यात येत आहे.