Thu, Sep 20, 2018 03:50होमपेज › Konkan › अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; कर्नाटकातील तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; कर्नाटकातील तरुणाला अटक

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:28PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील उद्यमनगर परिसरात शेजारीच राहणार्‍या 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार, दि. 11 जून रोजी सायंकाळी 7 ते 8 वा. सुमारास घडला आहे. या प्रकरणी संशयित तरुणाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मंजुनाथ लिंगाप्पा हसमनी (39, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, पीडित मुलगी सोमवारी घराबाहेर खेळत असताना मंजुनाथने तिला चहा आणि बिस्किट देतो, असे सांगून आपल्या रुममध्ये नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलगी घरी रडत आल्यावर तिच्या आईने तिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने घडला प्रकार आईला सांगितला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यावर संशयित मंजुनाथ हसमनीला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली.