Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : ट्रक-दुचाकी अपघात; एक गंभीर जखमी

रत्‍नागिरी : ट्रक-दुचाकी अपघात; एक गंभीर जखमी

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:18PM

बुकमार्क करा
साखरपा : वार्ताहर

नजीकच्या दाभोळे येथे शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. एस.टी. बसला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्यामुळे समोरून आलेल्या ट्रकची धडक बसून हा अपघात झाला.

 राजेश शांताराम रेवाळे (वय 38, रा. दाभोळे-सुकमवाडी) हे सकाळी 7.30 वा. सुमारास मुलगा पार्थ याला शाळेत पोहोचविण्यासाठी दुचाकीने साखरपा येथे येत होते. दाभोळे बाजारपेठ नजीक समोरून येणार्‍या ट्रकचा त्यांना अंदाज न आल्याने त्यांची ट्रकला धडक बसली. 

या अपघातात राजेश रेवाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने रेवाळे यांचा मुलगा पार्थ यास किरकोळ दुखापत झाली. ट्रकचालक यशवंत पवार (30, रा. शिरगाव) याने प्रसंगावधान दाखवत  जखमी रेवाळेंसह त्यांच्या मुलाला रस्त्यावरून बाजूला घेतले. साखरपा येथील रिक्षाचालक जया बने यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना साखरपा प्रा. आ. केंद्रात आणले. तेथे जखमींवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रेवाळे यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पं.स. सदस्य जयसिंग माने, बापू शिंदे यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमींची चौकशी केली. पोलिसांनी पंचनामा करत ट्रक आणि दुचाकी ताब्यात घतली आहे.