Fri, Mar 22, 2019 00:10
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › एसटी विभागीय वाहतूक अधिकार्‍यांना मारहाण; दोन कर्मचार्‍यांचे निलंबन

एसटी विभागीय वाहतूक अधिकार्‍यांना मारहाण; दोन कर्मचार्‍यांचे निलंबन

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 10:36PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी एसटीच्या विभागीय वाहतूक अधिकार्‍यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 संशयितांपैकी रत्नागिरीतील विभागीय कार्यशाळेतील दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपयंत्र अभियंता (चालन)  विजय दिवटे यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. अमोल जाधव आणि भाऊ पालकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. 

या आधीही अमोल जाधव याच्यावर अरुण आखाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. संपकाळात 9 जून 2018 रोजी एस.टी. चालक नितीन कारंडे याने चिपळूण कुंभार्ली घाटात ‘शिवशाही’ बसवर दगडफेक केली होती. त्या कारणावरून विभागीय वाहतूक अधिकारी संतोष गणपती बोगरे (34, रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी कारंडेला मारहाण केली होती. 
या वादातूनच सोमवार 18 जून रोजी रात्री 8.30 वा. सुमारास हरिभाऊ माळी, सुनील साळवी, अमोल जाधव, भाऊ पालकर, एस.पी.सावंत, सुनील जाधव आदी संशयित जमाव करुन बोगरे यांच्या कार्यालयात  गेले. तेथे बोगरे यांच्या शासकीय  कामात अडथळा निर्माण करत त्यांना हातांनी आणि लाथा-बुक्क्यांनी  मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली होती. या सहाजणांना अटक करून न्यायालयात कोठडी झाल्यानंतर जामीन झाला होता.