Thu, Apr 25, 2019 17:38होमपेज › Konkan › एस.टी. डेपोचे नुकसान प्रकरण; लिपिकाला २ वर्षे कारावास

एस.टी. डेपोचे नुकसान प्रकरण; लिपिकाला २ वर्षे कारावास

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:28PMरत्नागिरी रू प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी शहरातील माळनाका येथील एस.टी. डेपोमध्ये चार महिन्यांच्या कालावधीत दोनवेळा आग लागून लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी डेपोतीलच कनिष्ठ लिपिकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 वर्षेे सश्रम कारावास आणि 6 हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. 

यशवंत जानराव रामागडे (वय 36, मूळ रा. अमरावती) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. यातील पहिली घटना 6 एप्रिल 2016 रोजी घडली होती. एस.टी. डेपोमधील कॅश सेक्शन विभागाला आग लावून सुमारे 15 लाख 70 हजार 800 रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी रामागडे विरोधात तत्कालीन आगार व्यवस्थापक सुरेश शेरे यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 8 ऑगस्ट 2016 रोजी डेपोतील डिझेल कार्यालयात डिझेल ओतून लाग लावण्याचा प्रयत्न रामागडेने केला होता.