Fri, Apr 19, 2019 12:26होमपेज › Konkan › कोकणातील नद्यांचे पुनरुज्जीवन, संवर्धनासाठी ‘रॅली फॉर रिव्हर’

कोकणातील नद्यांचे पुनरुज्जीवन, संवर्धनासाठी ‘रॅली फॉर रिव्हर’

Published On: Aug 11 2018 10:33PM | Last Updated: Aug 11 2018 10:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन तसेच त्यांचे संवर्धन करण्यासाठी ‘रॅली फॉर रिव्हर’  प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अलीकडेच या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.

कोकणातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे आसपासच्या परिसरातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनही होणार आहे. या प्रकल्पासाठी आराखड्यानुसार  कोकणातील दहा प्रमुख आणि 34 लहान नद्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी या प्रमुख नद्या समाविष्ट आहेत. 

पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प राबविण्याचा उद्देश असून यासाठी राज्य शासनासह केंद्रीय निधी देण्यात येणार आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात सूक्ष्म सिंचनास प्राधान्य दिल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न पाचपटीने वाढण्यास मदत होणार आहे. वृक्ष लागवड, पीक पद्धती बदलणे आदींचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.