होमपेज › Konkan › नजीब मुल्लांसाठी शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांची बैठक

नजीब मुल्लांसाठी शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांची बैठक

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:00PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या इतिहासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी प्रथमच एकत्र येत बैठक घेऊन नजीब मुल्ला यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या एकत्रिकरणामुळे नजीब मुल्ला यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

रत्नागिरी येथील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन पदाधिकार्‍यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली होती. विशेष म्हणजे या बैठकीमागे कोणत्याही प्रकारे राजकीय पार्श्‍वभूमी नसतानाही या शिक्षकांनी स्वत:हून पुढाकार घेत या बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीमध्ये जिल्हाभरातील शिक्षकांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच पदाधिकार्‍यांनी आपणाला काम करणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली. पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा निधी हा वॉटर,  गटर, मीटरसाठी खर्च करणार्‍या या आधी संधी दिली असली तरी आता आपणाला खर्‍या अर्थाने आपल्या हक्काच्या, आपल्या समस्या जाणून घेणार्‍या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याची गरज पदाधिकार्‍यांनी  या बैठकीत व्यक्त केली. नजीब मुल्ला यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. त्यामुळेच त्यांच्या विजयासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, असा ठराव येथे एकमताने मंजूर करण्यात आला.