Thu, Apr 25, 2019 22:06होमपेज › Konkan › मुंबई-गोवा क्रूझ रत्नागिरीतही थांबणार!

मुंबई-गोवा क्रूझ रत्नागिरीतही थांबणार!

Published On: Aug 12 2018 10:30PM | Last Updated: Aug 12 2018 10:22PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

केंद्रीय महामार्ग व जलवाहतूक मंत्री नितिन गडकरी यानी पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई-गोवा मार्गावर क्रूझ सफारीची सुरुवात येत्या दि. 3 ऑक्टोबरपासून होत असल्याची माहीती दिली. मात्र, कू्रझची सफर मार्गावरच असलेल्या रत्नागिरीवसीयांना मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

 कोकणच्या दृष्टीने रत्नागिरी बंद महत्त्वाचे असल्याने या आलिशान प्रवासी जहाजाला रत्नागिरी थांबा देणार असल्याचे जलवाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.पाचशे पर्यटकांची क्षमता असलेल्या क्रूझमुळे पर्यटनाबरोबर  रोजगार उपलब्ध होईल. रत्नागिरी बंदर कोकणच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने क्रूझने थांबा घेण्याची आवश्यकता आहे, असा आग्रह रत्नाागिरी येथील अ‍ॅड. पाटणे यांच्यासह काही मंडळींनी धरला होता. त्या दृष्टीने क्रूझ हाताळण्याच्यासाठी रत्नागिरीसह सर्व महत्वाच्या बंदरांवर क्रूझ टर्मिनल कार्यान्वित करण्याची स्पष्ट सूचना जलवहातूक मंत्रालयाने दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर सुरु होणार्‍या मुंबई -गोवा क्रूझला रत्नागिरी थांबा मिळणार की नाही, याबाबत गेले  काही महिने सुरु असलेला संभ्रम आता दूर झाला आहे.

तसेच कोकणात गुंतवणूकदार पुढे येत नसल्याने बोट खरेदीकरीता केंद्राने शिपिंग कार्पोरेशनला 800 कोटींचा निधी मंजूर केल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले  आहे. मुंबई-गोवा  राष्ट्रीय महामार्गाबरोबर क्रूझ पर्यटनाचा विषय मार्गी रत्नागिरीवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.