Fri, Apr 26, 2019 10:01होमपेज › Konkan › स्त्री जन्मदरात कोकण अव्वल

स्त्री जन्मदरात कोकण अव्वल

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:20PMरत्नागिरी :

राजेंद्र पाष्टे सध्याच्या डिजिटल युगात स्त्री जन्माबाबत काही समाजातील चौकट अद्यापही खिळखिळी असताना कोकण स्त्री जन्मदरात अव्वल आहे. ठाणे जिल्हा लोकसंख्येच्या दरात अग्रणी असताना रत्नागिरी महिला  साक्षरतेच्या प्रमाणातही नंबर वन आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 94.95 टक्के आहे. तर सुदृढ लोकसंख्येच्या साक्षरतेत रत्नागिरी जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अग्रणी आहे. 

स्त्री जन्मदरात रत्नागिरी जिल्हा अव्वल असताना साक्षरतेच्या प्रमाणातही फीमेल गुणकच नंबर वन ठरला आहे. कोकणासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे. आतापर्यंत सात वेळा कोकण मंडळ अग्रणी राहताना  विद्यार्थिनींनीच या निकालात प्रगतीचा आलेख उंचावलेला आहे.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कोकणातील साक्षरतेची ही बाब अधोरेखित करताना रत्नागिरी जिल्हा स्त्री जन्मदरात पहिल्या क्रमांकावर आहे.  त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी साक्षरतेमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. स्त्री जन्मदरात रत्नागिरी जिल्हा दर हजारी पुरूषामागे महिलांचे प्रमाण 1122 आहे. तर साक्षरतेमध्ये पुरूषांचे 83.43 टक्के आहे. 

कोकणातील अन्य जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 79.77 टक्के आहे. रायगड जिल्ह्यात 76.92 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महिला साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 91.98 टक्के महिला स्वत: स्वाक्षरी करू शकतात. हेच प्रमाण पालघर जिल्ह्यात 78.79 टक्के आहे.