Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Konkan › कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा २३ रोजी ‘रेल रोको’

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा २३ रोजी ‘रेल रोको’

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 10:08PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे 23 एप्रिल रोजी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘रेल रोको’ करण्यात येणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची आंदोलनपूर्व सभा नुकतीच रत्नागिरी येथे झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कृती समितीतर्फे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या रेल रोकोमध्ये बळीराजा शेतकरी संघटना, केआयसी एम्प्लॉईज युनियन, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसप यांच्यासह अन्य पक्षही या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना नेहमीच डावलण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या अन्यही मागण्या आहेत.

या आंदोलनात कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम आणि सहकार्‍यांनी केले आहे.