होमपेज › Konkan › गणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता 

गणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता 

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:59PMरत्नागिरीः प्रतिनिधी 

गणपतीपुळे विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. त्याची सविस्तर अंदाजपत्रके बनवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली. गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामांना अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात  आली आहे. त्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सुशोभिकरण, अंतर्गत रस्ते, पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशी कामे आराखड्यातील समाविष्ट करण्यात आली असून याची अंदाजपत्रके आता सविस्तर करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी रताना त्यांना कार्यत्तोर मंजुरी लवकरच देण्यात येणार आहे.