Sat, Mar 23, 2019 12:37होमपेज › Konkan › १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी

१ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:30PMरत्नागिरी : प्रतिनिधी

 कोकणातील सागर किनार्‍यावर यांत्रिक मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्याच्या सूचना प्रशासनांना दिल्या आहेत. 

पावसाळ्यात म्हणजेच जून व जुलै महिन्यांमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. त्यामुळे या काळात मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची  जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होते. या हेतूने यावर्षी 1 जून ते 31 जुलै या कालावधीत कोकणात सागरी क्षेत्रात मासेमारीवर बंदी घातली आहे. या कालावधीत ही बंदी सागर किनार्‍यापासून 12 सागरी मैल अंतरापर्यंत लागू असणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार प्रशासनांना सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार मासेमारी बंदीचा कालावधी कोकण किनारपट्टी भागात अधिसूचीत केला आहे.