Sun, Aug 25, 2019 12:24होमपेज › Konkan › जिल्हाप्रमुख पदाची माळ विलास चाळकेंच्या गळ्यात

जिल्हाप्रमुख पदाची माळ विलास चाळकेंच्या गळ्यात

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:01PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

परिपूर्ण नेता म्हणून ओळख असलेल्या विलास चाळके यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. तब्बल 11 वर्षांनंतर हा संघटनात्मक बदल झाला आहे. संघटनेत गट-तट निर्माण होणार नाहीत. पक्ष हाच एक घट्ट गट राहील, अशा पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन जिल्हाप्रमुख चाळके यांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख गेल्या 28 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. माजी आमदार सुभाष बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्यासोबत त्यांनी पक्ष कार्य केले. त्यामुळे त्यांना प्रशासनासह सर्व क्षेत्रांचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य पदांबरोबरच शिक्षण व अर्थ समिती सभापती म्हणूनही त्यांनी गुणात्मक काम केले आहे.

जनतेला कोणते काम आवश्यक आहे. ते काम पाठपुरावा करून कसे मार्गी लावून घ्यायचे, तळातल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांना मीतभाषी स्वभावाने पक्षीय कार्याला उद्युक्त कसे करायचे, ही सारी कला व गुण असल्यानेच नूतन जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना परिपूर्ण नेता म्हणून ओळखले जाते. खा. विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला आणि आ. उदय सामंत, आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण पाठिशी राहिल्याने हे मानाचे पद मिळाले असल्याचे सांगून या नेत्याप्रती चाळके यांनी आदरभाव व्यक्त केला. पदाला न्याय देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.