Fri, Mar 22, 2019 08:39होमपेज › Konkan › आंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंयb

आंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंय

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

प्रशासनाच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्यानेच लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. राज्यात व जिल्ह्यात परिस्थिती सारखीच असून ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी स्थिती शासनाची झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे आ.अनिकेत तटकरे यांनी केली.

जिल्हा नियोजनची बैठक मंगळवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. उदय सामंत, आ.राजन साळवी, आ.संजय कदम, आ.सदानंद चव्हाण, आ.अनिकेत तटकरे, आ.निरंजन डावखरे आदी आमदार व नियोजनचे सदस्य उपस्थित होते.

नियोजनच्या पहिल्याच बैठकीनंतर आ.तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा नियोजनच्या वार्षिक आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री अनेक उपक्रमांबद्दल भरभरून बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यात व कृतीत फरक असल्याचे आ.तटकरे यांनी सांगितले. अनेक विकासकामेही अपूर्ण अवस्थेत आहेत. मुळात गेले चार महिने आचारसंहितेमुळे कामे रखडली आहेत. याविषयी अधिकारी वर्गाच्या ढिम्म कारभारावर वचक नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. नियोजनची बैठक आठ महिन्यांनी झाली. मात्र, या कालावधीत आढावा बैठका होत नसल्याने अधिकारी वर्ग मन मानेल तसा कारभार करीत आहेत. जिल्ह्यातील नगर परिषदा व जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने शासकीय जागा ताब्यात घेण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे आ.तटकरे यांनी सांगितले.