Thu, Aug 22, 2019 11:21होमपेज › Konkan › गणेशोत्सवासाठी एसटीचे सामूहिक आरक्षण खुले

गणेशोत्सवासाठी एसटीचे सामूहिक आरक्षण खुले

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:44PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी एसटीने 2 हजार 225 बसेसची सोय केली आहे. एसटीसह चाकरमान्यांकडे  गावी जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचाही पर्याय असला तरी देखील आरक्षण मिळणे अवघड झाल्याने एसटीही गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी सज्ज झाली आहे.

या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने आपल्या इतर विभागांकडून 2 हजार 225 बसेस मुंबई मार्गावर गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या गाड्या दि. 9 ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच सामूहिक आरक्षणासाठी दि. 1 ऑगस्टपासून सुरुवातदेखील करण्यात झाली आहे. दरम्यान, ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या नावांच्या यादीसह आपल्या जवळच्या बस आगारात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.