Thu, Feb 21, 2019 09:10होमपेज › Konkan › ५० कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता

५० कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता

Published On: Sep 07 2018 10:19PM | Last Updated: Sep 07 2018 10:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सन 2018-19 साठी 20 कोटी 97 लाख 88 हजार 730 रुपयांच्या मूळ आणि 28 कोटी 22 लाख 70 हजारांच्या सुधाारित अंदाजपत्रकाला शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अर्थ समिती सभापती सहदेव बेटकर यांनी सभागृहात जिल्हा परिषदेचे बजेट सादर केले. अर्थसंकल्पामध्ये समाजकल्याण, बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा स्वरूपा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष संतोष गोवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांच्यासह विषय समित्यांचे सभापती, सर्व खातेप्रमुख आणि सदस्य उपस्थित होते. 

सभेत अर्थ समिती सभापती बेटकर यांनी जिल्हा परिषदेचे सन 2018-19 साठीचे मूळ अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये 15 कोटी 75 लाख 6 हजार 400 रुपयांचा महसुली खर्च, 4 कोटी 21 लाख 65 हजार 700 रुपयांचा भांडवली खर्च, 1 कोटी वित्तप्रेषण आणि 1 लाख 16 हजार 630 अखेरची शिल्लक असे 20 कोटी 97 लाख 88 हजार 730 रूपयांचे मूळ अंदाजपत्रक मांडण्यात आले. या अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी दिली. मूळ अंदाजपत्रकापेक्षा सुधारित अंदाजपत्रक अधिक रकमेचे बनवण्यात आल्याची माहिती सभापती बेटकर यांनी सभागृहात दिली.

या अर्थसंकल्पात अध्यक्ष निधी म्हणून 1 कोटी 3 लाख 51 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागासाठी 1 कोटी 30 लाख 80 हजार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी 2 कोटी 69 लाख 49 हजार, समाजकल्याण विभागासाठी 4 कोटी 28 लाख 38 हजार, दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी 77 लाख 15 हजार, महिला व बाल कल्याण विभागासाठी 1 कोटी 38 लाख 35 हजार, शिक्षण विभाग 1 कोटी 80 हजार, बांधकाम विभागासाठी 3 कोटी 2 लाख, आरोग्य विभागासाठी 94 लाख 45 हजार, शेतीसाठी 1 कोटी 9 लाख, पशुसंवर्धनसाठी 70 लाख 31 लाख, सामूहिक विकासासाठी 2 कोटी 12 लाख, संकीर्ण ऊर्जा विकाससाठी 6 लाख 71 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.