Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Konkan › भाट्ये समुद्रकिनारी प्रकाशमान लाटांचे कुतूहल!

भाट्ये समुद्रकिनारी प्रकाशमान लाटांचे कुतूहल!

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:46PMरत्नागिरी : प्रतिनिधी

येथील भाट्ये आणि अन्य किनार्‍यांवर गेल्या दोन दिवसांपासून निळ्या प्रकाशमान लाटांचा अद्भुत नजारा अनुभवायला मिळत आहे. स्थानिक आणि पर्यटकांमध्येही याबाबत कुतूहल असून या लाटा पाहण्यासाठी रात्रीच्यावेळी किनारी भागात गर्दी होत आहे.

समुद्रात असे अनेक सजीव आहेत, जे दिवसा बाहेर न येता फक्‍त रात्रीच बाहेर येतात. रात्री जेव्हा समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धडकतात, तेव्हा त्यांसोबत निळ्या रंगाचे अगणित दिवे प्रकाशित झाल्यासारखे दिसतात. प्रश्‍न असा पडतो की समुद्रात हा चमचमणारी निळी प्रकाशकिरणे येतात तरी कुठून?

रत्नागिरीच्या किनार्‍यावरील या लाटा चमकू लागल्याची शास्त्रीय कारणे काही वेगळीच आहेत. रत्नागिरी किनार्‍याच्या लाटा उजळून टाकणारे हे जीव प्लवंग आहेत. त्यांचे शास्त्रीय नाव नॉक्टिल्युका (पेलींळर्श्रीलर) असल्याचे स्पष्ट झाले आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनार्‍यावर येतात आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात, तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश (लळेर्श्रीाळपशीलशपलश) निर्माण करण्याची क्षमता असते. 

यामुळे किनार्‍यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात, तेव्हा ते प्रकाशमान होतात. आकाराने अत्यंत सूक्ष्म असलेले हे जीव एकाच वेळी समुद्राच्या पाण्यात लाखो करोडोच्या संख्येने असतात. यामुळे ते जेव्हा किनार्‍यावर येऊन आदळतात, तेव्हा अख्खा किनाराच निळ्या प्रकाशाने उजळून निघतो.

रत्नागिरीतील बहुतेक किनारपट्टी भागात निळ्या लाटा द‍ृष्टीस पडत आहेत. याबाबत लोकांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे अनेकजण आवर्जून रात्रीच्या वेळी किनार्‍यावर जाऊन हा नजारा अनुभवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.