होमपेज › Konkan › २६० गावे तहानलेली

२६० गावे तहानलेली

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:44PMरत्नागिरी : प्रतिनिधी

उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नऊ तालुक्यांमधील 260 गावे आणि 486 वाड्यांचा समावेश आहे. ही टंचाई निवारण्यासाठी 5 कोटी 49 लाखांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहे.

या अराखड्यात मंडणगड तालुक्यातील 19 गावे 24 वाड्या, दापोलीतील 39 गावे 72 वाड्या, खेड 45 गावे 112 वाड्या, गुहागर 18 गावे 41 वाड्या, चिपळूण 30 गावे 45 वाड्या, संगमेश्‍वर 25 गावे 51 वाड्या, रत्नागिरी 28 गावे 36 वाड्या, लांजा 32 गावे 60 वाड्या आणि राजापूर तालुक्यातील 24 गावे 45 वाड्यांचा समावेश आहे.जिल्ह्यात 110 ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात येणार आहेत.