होमपेज › Konkan › अतिरिक्‍त जमीन घेण्याचा घाट

अतिरिक्‍त जमीन घेण्याचा घाट

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 10:50PMरत्नागिरी  : प्रतिनिधी

रत्नागिरीतील विमानतळाच्या विस्तारीकरणात शिरगाव व मिरजोळे या ग्रामपंचायत हद्दीतील अतिरिक्‍त जमीन घेण्याचे नियोजन असून सोमवारी शिरगाव ग्रामस्थांनी येथे सुरू करण्यात आलेली मोजणीची प्रक्रिया रोखली. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी ग्रामस्थांसमवेत झालेल्या बैठकीत जमिनीची मोजणी करण्यापूर्वी ग्रामस्थांची संयुक्‍त बैठक घ्यावी, मगच पुढील कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी येत्या आठवडाभरात संयुक्‍त बैठक लावण्याचे ग्रामस्थांना आश्‍वासन दिले. मंगळवारी झालेली बैठक प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी दोन गावांतील ग्रामस्थांसह कोस्टगार्ड, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.