Thu, Jul 18, 2019 12:23होमपेज › Konkan › लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

Published On: Aug 26 2018 10:42PM | Last Updated: Aug 26 2018 10:42PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी सौद मुराद कडवैकर (अंत्रवली, ता. संगमेश्‍वर,  सध्या रा. चिपळूण) याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत रविवारी गुन्हा दाखल झाला असून त्यास चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. 

संशयित आरोपीने डिसेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातच ती बालिका गर्भवती राहिली. त्यामुळे तिच्या पालकांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी सौद कडवैकरला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करीत आहेत.