Fri, Sep 21, 2018 01:46होमपेज › Konkan › दापोलीत बालिकेवर दोघा अल्पवयीनांचा अत्याचार

दापोलीत बालिकेवर दोघा अल्पवयीनांचा अत्याचार

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 07 2018 1:00AMदापोली : वार्ताहर

तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संशयित सुद्धा अल्पवयीन असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात पोक्सोे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास घराशेजारी खेळायला गेली होती. यावेळी एका नऊ वर्षांच्या मुलाने तिला खेळायला जाऊ असे सांगून एका बंद घरामध्ये नेले व तेथे पडवीत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तेथेच अन्य एक पाच वर्षांचा मुलगा आला व त्यानेही तसेच कृत्य केले. दरम्यान, पीडित मुलीला याचा त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर या मुलीला अधिक त्रास होऊ लागल्याने तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार दाभोळ पोलिस ठाणे हद्दीत घडला असल्याने गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.