दापोली : वार्ताहर
दापोलीनजीक एका गावामध्ये 25 वर्षीय तरुणाने आठ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केला आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी या तरुणावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दि.28 रोजी सायं. 6.30 वा.च्या सुमारास ही घटना घडली. शिकवणीसाठी गेलेली आठ वर्षीय चिमुकली लघुशंकेसाठी गेली असता 25 वर्षीय तरुणाने शौचालयाचा दरवाजा बंद करून तिच्यावर अतिप्रसंग केला व तो तेथून पसार झाला.
यावेळी शिकवणी घेणार्या महिलेने या चिमुरडीला घरी नेऊन सोडले. हा प्रकार आधी काहीवेळ पालकांच्या लक्षात आला नाही. दरम्यान, अचानक रक्तस्राव झाल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी दापोली रुग्णालयात दाखल करण्यात आले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेतील पीडित बालिकेची प्रकृती आणखी खालावल्याने तिला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.