Tue, Jul 23, 2019 10:31



होमपेज › Konkan › चिमुरडीवर बलात्कार; नराधमाला अटक

चिमुरडीवर बलात्कार; नराधमाला अटक

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 9:48PM



राजापूर : प्रतिनिधी

शहरानजीकच्या कोदवली मांडवकरवाडी येथे मोबाईलवर गेम खेळायला देतो, असे सांगून आठ वर्षांच्या चिमुरडीवर नराधम तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित 
मुलीच्या आईने राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित मंगेश महादेव राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश महादेव राऊत ऊर्फ बंड्या  (वय 26, रा. कोदवली मांडवकरवाडी) याचे पीडित बालिकेच्या घरी नेहमी येणे-जाणे असते. अशातच शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मंगेश हा पीडित मुलीच्या घरी गेला. यावेळी घरात चिमुरडी एकटीच असल्याचे पाहून मंगेश याने तिला मोबाईलवर गेम खेळायला देतो, असे सांगून खोलीत नेऊन बलात्कार केला. सायंकाळी पीडित चिमुरडीचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घडलेला सर्व प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी काही ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. रविवारी सकाळी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी मंगेश राऊत याला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयसिंग पाटील व सहकारी एस. डी. पडवळ करत आहेत. दरम्यान, पीडित बालिकेला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.