Wed, Sep 19, 2018 16:59होमपेज › Konkan › ' राम ' नामाने आचरानगरी दुमदुमली (video)

' राम ' नामाने आचरानगरी दुमदुमली (video)

Published On: Mar 25 2018 9:45PM | Last Updated: Mar 25 2018 9:45PMआचरा: उदय बापर्डेकर

ऐन मध्यांतराचा समय, भर दुपारचे बारा वाजले, उन्हाचे चटके पायांना बसत होते. सूर्य डोक्यावर आला होता. वातावरणातील उष्म्याचा  झळा वाढलेल्या. रामेश्वर मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. हरिदासबुवाचे कीर्तन रंगात आलेले आणि ऐतिहासिक रामेश्वर मंदिराच्या परिसरात तोफा दाणाणल्या..... नगरखान्यातील मंगलवाध्ये वाजू लागली .बंदुकाच्या फोरी झडू लागल्या ....रामेश्वर मंदिरात पाळणा हळूहळू खाली येऊ लागला आणि आरंभात ' जय जय रघुवीर समर्थ ' ची ललकारी आसमंत दुमदुमली.....!

गुलाल, अक्षतांची उधळण सुरू झाली. हा मंगलसमयी क्षण होता राम जन्मोत्सवाचा..! या क्षणाची याची देही याची डोळा साक्षात अनुभूती घेण्यासाठी हजारो भाविकांनी रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तुफान गर्दी केली होती. सर्वत्र एकच आवाज गुंजत होता ' राम जन्मला ग सखी ...राम जन्मला...राम जन्मोत्सवाचा हा अनोखा दिमाखदार सोहळा संस्थानकालीन आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या मंदिरासह जिल्‍ह्यातील विविध भागात मोठया दिमाखात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

या उत्सवाच्या मंगलदायी क्षणाची अनुभूती घेण्यासागठी मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. शाही थाटात रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर सुंठवडा प्रसाद व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. राम जन्मावर विविध गीते सादर करण्यात आली होती. संध्याकाळी पुराण वाचन झाल्यानंतर श्री च्या दरबारात यांच्या बहारदार गायकीने या उत्सवाला द्विगुणात केले. रात्री महापूजा, पुराणवाचन नंतर नेत्रदीप पालखी सोहळा त्यानंतर कीर्तन असे कार्येक्रम झाले. उत्सवासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राची  यंत्रणा तसेच आचरा पोलिस घण्याचे पोलीस निरीक्षक ऐस आर धुमाळे व त्यांचा सहकार्यांनी उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली...!!