Thu, Sep 20, 2018 16:47होमपेज › Konkan › ‘त्या’ कंपनीवर कारवाई करा

‘त्या’ कंपनीवर कारवाई करा

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:22PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा  राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातांमधील मृतांसह जखमींना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीबरोबरच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडविणार्‍या ठेकेदार कंपनीवर कारवाई करून तत्काळ महामार्गाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी गुरुवारी नागपूर अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कोकणातील आमदार एकवटल्याचे   दिसून आले. शिवसेनेचे कोकण पक्षप्रतोद व आ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, सदानंद चव्हाण, रूपेश म्हात्रे, प्रकाश सुर्वे, श्रीमती तृप्ती सावंत, अजय चौधरी, मनीष कुडाळकर, सुनील शिंदे, मनोहर भोईर, प्रकाश फापर्डेकर आदींचा सहभाग होता.