Fri, Apr 19, 2019 12:23होमपेज › Konkan › सेनेचे ‘रिफायनरी हटाव’

सेनेचे ‘रिफायनरी हटाव’

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 10:43PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाणार-कुंभवडे परिसरातील बाभुळवाडी येथे उभारल्या जाणार्‍या अवाढव्य पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध तीव्र करण्यासाठी शिवसेनेच्या  वतीने नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये बुधवारी विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. 

यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असून स्थानिक आमदार म्हणून आ. राजन साळवी वेळोवेळी हा प्रकल्प रद्द होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत बुधवारी शिवसेनेच्या वतीने विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून रिफायनरीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. तसेच हा प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहील, असे शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट करत फलक फडकावत जोरदार घोषणा देत कोकणातील प्रकल्पाविरोधात आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते आ. सुनील प्रभू, शिवसेनेचे कोकण पक्षप्रतोद आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण, आ. भरतशेठ गोगावले, आ. वैभव नाईक, आ. उदय सामंत, आ. सुनील शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. तृप्ती सावंत, आ. मनोहर भोईर, आ. तुकाराम काटे आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन या प्रकल्पाला जोरदार विरोध केला.