Thu, Nov 15, 2018 20:04



होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’विरोधात १४ रोजी मुंबईत मोर्चा

‘रिफायनरी’विरोधात १४ रोजी मुंबईत मोर्चा

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:22PM



राजापुर :

सातत्याने आंदोलने करूनही शासनाकडून रिफायनरीला विरोध नसल्याचे सांगितले जात असल्याने संतप्त कोकणवासीयांनी आता बुधवार, दि.14 मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे आंदोलन होणार आहे. यासंदर्भात रविवारी मुंबईच्या परळमधील शिरोडकर हॉलमध्ये सभा पार पडली. त्या वेळी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, सरचिटणीस नितीन जठार, योगेश नाटेकर आदी उपस्थित होते.