Fri, Jul 19, 2019 05:52होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात शिवसेनेची आज ‘चले जाव’ संघर्ष यात्रा

‘नाणार’विरोधात शिवसेनेची आज ‘चले जाव’ संघर्ष यात्रा

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:42PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात  शिवसेनेच्या चले जाव संघर्ष यात्रेतील पहिल्या टप्प्यात  दि. 8 जुलैला सकाळी 11 वाजता डोंगर तिठा ते चौके अशी ही यात्रा काढण्यात येणार आहे.
विद्यमान केंद्र व राज्य शासनाने निसर्गरम्य कोकणभूमीला अरबांच्या घशात घालण्याचा डाव रचला असून, हा प्रयत्न शिवसेना कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा खा. विनायक राऊत यांनी दिला. स्थानिकांचा प्रखर विरोध असतानादेखील केंद्र सरकारने सौदीची ‘अराम्को’ कंपनी व अबुधाबीची ‘सनॉक’ या परदेशी कंपन्यांशी करार केले आहेत. शिवसेना त्या विरोधात असून कोणत्याही परिस्थितीत या परदेशी कंपन्यांना कोकणच्या भूमीत थारा दिला जाणार नाही. त्यासाठी शिवसेना आक्रमकपणे विरोध करणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रकल्पाविरोधात ‘चलेजाव’ संघर्ष यात्रे अंतर्गत पहिल्या टप्प्यात  दि. 8 जुलैला सकाळी 11 वाजता डोंगर तिठा ते चौके अशी 2 कि.मी.ची ही यात्रा असेल. यात शिवसेनेचे आमदार, खासदार सहभागी होणार आहेत, अशी त्यांनी माहिती दिली.