Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’विरोधात आज मुंबईत आंदोलन

‘रिफायनरी’विरोधात आज मुंबईत आंदोलन

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 10:36PMराजापूर : प्रतिनिधी 

विविध पातळ्यांवर सातत्याने आंदोलने करूनही शासनाकडून रिफायनरीला विरोध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतप्‍त रिफायनरी विरोधकांच्या वतीने बुधवार दि.14 मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5  या वेळेत हे आंदोलन होणार आहे.

या आंदोलनासंदर्भात मुंबईच्या परळमधील शिरोडकर हॉलमध्ये सभा घेऊन नियोजन करण्यात आले आहे.  या आंदोलनाला कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, सरचिटणीस, नितीन जठार, गिरीश राऊत नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, गिरीश मोंडे, रामचंद्र भडेकर, सत्यजित चव्हाण, राजेंद्र फातर पेकर, योगेश नाटेकर आदी उपस्थित  राहणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांना रिफायनरीला स्थानिकांकडून होत असलेला विरोध दिसत नसल्याने कोकणातील हजारो शेतकरी व मच्छीमार मुंबईत आझाद मैदानावर धडकणार आहेत. शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.  शासनाच्या  प्रकल्प लादण्याच्या भूमिकेवर प्रकल्प विरोधक नाराज असून आता मुंबईतील आझाद मैदानावर होणार्‍या आंदोलनात  काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.