Wed, Nov 21, 2018 23:29



होमपेज › Konkan › अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला अटक

अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला अटक

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:05PM

बुकमार्क करा




राजापूर : प्रतिनिधी 

बाईकवरुन जात असताना एका प्राथमिक शिक्षकाने अंगणवाडी सेविकेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील तळगाव येथे घडली असून यातील प्राथमिक शिक्षक वैजनाश महादेव कांबळे या शिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत  पीडित अंगणवाडी सेविकेच्या दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तळगाव केंद्रशाळा  क्रमांक 1 मध्ये वैजनाश महादेव कांबळे हा प्राथमिक शिक्षक आहे. दिनांक 1 जानेवारी रोजी ते आपल्या दुचाकीवरुन एका अंगणवाडी सेविकेला घेऊन चालले होते. तळगावातील एस. टी. थांब्याजवळ त्यांची गाडी आली असताना शिक्षक कांबळे यांनी त्या अंगणवाडी सेविकेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.

असे त्या पीडित अंगणवाडी सेविकेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्या अंगणवाडी सेविकेने गावात जाऊन आपल्या घरच्यांसह गावातील प्रमुख लोकांना झाला प्रकार सांगितला. त्यानंतर राजापूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी  संशयित आरोपी शिक्षक वैजनाश कांबळे याला अटक केली. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर तळगाव परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जे. एन. पाटील अधिक तपास करीत आहेत. शिक्षकानेच असे काळीमा फासणारे वर्तन केल्याने तळगाव परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.