Tue, Jul 16, 2019 22:19होमपेज › Konkan › राजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश

राजापूर पं.स. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 11:04PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

राजापूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक सोळंकी यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.ने दिले आहेत. दरम्यान, सोेळंकी हे रजेवर गेल्याने आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 7 डिसेंबर रोजी निलंबनाचे आदेश दिले.

तालुक्यातील पाचल हायस्कूलला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी भेट दिली होती. त्यावेळी तेथे व्हिजिट बुकची पाने फाडलेली आढळली. तसेच त्यातील शेरेही बदललेले होते. वेळच्या वेळी भेट देऊन तेथील सुविधांची, आरोग्यविषयक सुविधांची माहिती ठेवली नसल्याचे दिसून आले.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याबाबतची सर्व चौकशी करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विस्तार अधिकारी सोळंकी यांना दिल्या होत्या. त्याकडेही त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. अखेर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी 7 डिसेंबर रोजी शिक्षण विस्तार अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश काढले.