Sat, Mar 23, 2019 18:59होमपेज › Konkan › सेनेच्या राजन शेट्येंचा उमेदवारी अर्ज दाखल

सेनेच्या राजन शेट्येंचा उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Mar 19 2018 10:37PM | Last Updated: Mar 19 2018 10:30PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शक्‍ती प्रदर्शन करीत शिवसेनेचे राजन शेट्ये यांनी प्रभाग क्र. 3 च्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी उमेदवारी अर्ज भरताना नगराध्यक्ष राहुल पंडित, गटनेते प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह सेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी 11 पासून आलेल्या अर्जांची छाननी सुरू होणार आहे.

प्रभाग क्र. 3 ची पोटनिवडणूक 6 एप्रिल रोजी होणार आहे. 7 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. या दिवशी शिवसेनेचे उमेदवार राजन शेट्ये यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सेनेच्या नगरसेवकांसह जि. प. सदस्य, बेसिक व युवा सेना पदाधिकारीही उपस्थित होते. त्याचबरोबर प्रभागातील मतदार व शिवसैनिकांनीही हजेरी लावली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.

पोटनिवडणुकीसाठी यापूर्वी भाजपचे उमेदवार वसंत पाटील, राष्ट्रवादीकडून सनिफ गवाणकर यांचे नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर सेना उमेदवार राजन शेट्ये यांचे सुपुत्र प्रसाद शेट्ये यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी 11 पासून नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू होणार आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात ही छाननी होणार आहे. यावेळी राजन शेट्ये यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर प्रसाद शेट्ये आपली उमेदवारी मागे घेतील, असे सांगण्यात आले.
 

Tags : rajan shethy, Filing, nominations, shivsena