Sun, Nov 18, 2018 13:52



होमपेज › Konkan › देश अराजकतेकडे चालला आहे : राज ठाकरे

देश अराजकतेकडे चालला आहे : राज ठाकरे

Published On: Jan 13 2018 1:32AM | Last Updated: Jan 13 2018 1:32AM

बुकमार्क करा




रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवरच न्याय मागण्याची वेळ येतेय, यावरून देश किती अराजकतेकडे चालला आहे याची कल्पना येते, अशी बोलकी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे व्यक्‍त केली.

सरकार सर्वत्र नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. माध्यमेही उघडपणे बोलू शकत नाहीत. आता तर न्याय व्यवस्थेवरच नियंत्रण ठेवण्याचा सरकारकडून प्रयत्न झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जनतेच्या न्यायालयात येऊन आपली बाजू मांडल्यानंतर स्पष्ट होत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडत आहे. त्यामुळे त्या न्यायाधीशांचा किती कोंडमारा झाला असावा, याचा अंदाज येऊ शकतो, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

सरकारच्या प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणावर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘अडीच माणसे देश चालवत आहेत.’ ही सर्व परिस्थिती देश अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचे दाखवण्यास पुरेशी आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलच, असेही ते यावेळी म्हणाले. 

नाणार प्रकल्पातील जागा विकू नका, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. राज ठाकरे शुक्रवारी रत्नागिरीतील  शासकीय विश्रामगृहावर वस्तीला होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत घडलेल्या घडामोडीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.