Wed, Aug 21, 2019 06:35होमपेज › Konkan › आंबोलीत वर्षा पर्यटकांची गर्दी

आंबोलीत वर्षा पर्यटकांची गर्दी

Published On: Jul 01 2019 1:11AM | Last Updated: Jun 30 2019 10:40PM
आंबोली : वार्ताहर

आंबोली घाटातील मुख्य धबधबा जून महिन्याच्या अखेरीस शनिवारी 29 रोजी प्रवाहित झाल्यावर 30 जून या पहिल्याच रविवारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी भेट दिली. मात्र, अद्याप आवश्यक पाऊस न झाल्याने आंबोली घाटातील मुख्य धबधब्यासह इतर धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले नाहीत. रविवारी जिल्ह्यातील पर्यटकांसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, कर्नाटक व गोवा येथील पर्यटकांनी येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला.

घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. रविवार असल्याने मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित न झाल्याने गर्दी तशी कमी होती. कावळेसाद, महादेवगड पॉईंट, नांगरतास धबधबा व हिरण्यकेशी येथे ही पर्यटकांची तुरळक गर्दी होती.  दरम्यान, आंबोलीतील  हॉटेल्सचे झालेले आगाऊ बुकिंग पाहता पुढील शनिवार व रविवार विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज आहे.