Mon, Aug 26, 2019 08:59होमपेज › Konkan › ‘रेन हार्वेस्टिंग’चे पाणी मुरले कागदावरच!

‘रेन हार्वेस्टिंग’चे पाणी मुरले कागदावरच!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

कोकणातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय सक्षमतेने वापरण्यासाठी गावांचे समूहगट (क्‍लस्टर) स्थापन करण्यात आले होते. मात्र, या गटांना सुविधा न पुरवल्याने  रेन हार्वेस्टिंगद्वारे छपरावर साठविण्यात येणारे पाणी अधिकार्‍यांच्या कागदावरच मुरले आहे. चालू आर्थिक वर्षात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर कोकणातील सव्वाशे गावांत राबविण्यात येणार होती. रत्नागिरी जिल्ह्यात या प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या गावांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेच नाही. तसेच साहित्यही न पुरविल्याने ही पाणी साठवण आता उन्हाळ्यात कोरडी राहिली आहे. 
कोकणात सरासरी साडेतीन हजार मि.मी. पाऊस पडतो. राज्यातील अन्य विभागांच्या  तुलनेत कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर व्यवस्थापन राबवावे लागते.  

पावसाचे लाखो लिटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. पाणी अडविण्याबाबत कोकणातील उदासीनता झटकण्यासाठी छपरावर पडणारे पाणी रेन हार्वेस्टिंगद्वारे साठविण्यासाठी गावांचा समूहगट स्थापन करण्यात येणार होते. त्यानुसार कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात 25 याप्रमाणे सव्वाशे गावे निवडण्यात आली. यामध्ये प्राधान्याने ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार याची सुरुवात प्रत्येक ग्रामपंचायतीत करण्यात येणार होती. छपरावर पडणारे पाणी साठवण टाक्यांत जमा करून ते टंचाईच्या काळात वापरण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येणार होती.

Tags : Konkan, Konkan News, rainwater harvesting, not in work, only on paper


  •