Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Konkan › कशेडी घाटात कारला कंटेनारची ठोकर, एक जखमी 

कशेडी घाटात कारला कंटेनारची ठोकर, एक जखमी 

Published On: May 25 2018 11:53AM | Last Updated: May 25 2018 11:53AMपोलादपूर: धनराज गोपाळ

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवार रोजी रात्री १० वाजता चोळई हद्दीत एका अवघड वळणावर इनोव्हा कारला अज्ञात कंटेनरने धडक दिली. यामध्ये कार चालक जखमी झाला आहे.

कार चालक रुपेश रत्नाकर कुरूले (रा.नाशिक) हा आपली कार (क्र. एमएच ४३ एजे२०२१) घेऊन नाशिकहून गणपतीपुळे येथे जाता होते. यावेळी कशेडी घाटात चोळई हद्दीत हॉटेल अन्नपूर्णाजवळ आला असता अवघड वळणावर कंटेनरने कारला धडक दिली. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले असल्याचे पोलीसांनी सांगितले. 

या वळणावर वारंवार अपघात होत असल्याने येथे उपाय योजना होणे गरजेचे आहे मात्र मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.