Sun, Feb 17, 2019 23:48होमपेज › Konkan › नाणार रद्दची अधिसूचना अंतिम टप्प्यात

नाणार रद्दची अधिसूचना अंतिम टप्प्यात

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:32PMपुणे : प्रतिनिधी

कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. अनेक गावांंना हा प्रकल्प नको आहे. तसे ठराव ग्रामपंचायतींनी राज्य शासनाला सादर केले आहेत. त्यानुसार या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ती लवकरच रद्द होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली. 

देसाई म्हणाले, राज्यात उद्योेगांना चांगले वातावरण आहे. औद्योगिकीकरणात मोठी वाढ होत आहे. ‘मॅग्‍नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत विविध औद्योेगिक कंपन्यांबरोबर 12 लाख कोटी रुपयांचे करार झाले आहेत. राज्य शासनाबरोबर करार केलेल्या 2 हजार 400 कंपन्यांपैकी 2 हजार 121 कंपन्यांनी उद्योेग सुरू केले आहेत. तसेच उद्योेगांसाठी लागणारी जमीन, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधांसह राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. राज्यात 288 औद्योेगिक क्षेत्र असून, स्थानिक जनतेला उद्योग नको असतील तर त्यांच्यावर लादू नयेत, असे राज्य शासनाचे धोरण असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

अनेक उद्योजकांनी ‘एमआयडीसी’मध्ये जमिनी घेतल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यावर उद्योग सुरू केलेला नाही. त्यामुळे या जमिनी मोकळ्या आहेत. हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या मोकळ्या भूखंडांपैकी दोन हजार भूखंड ताब्यात घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.