Wed, Nov 14, 2018 03:46होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात २४ तासांत मुसळधार पाऊस होणार

सिंधुदुर्गात २४ तासांत मुसळधार पाऊस होणार

Published On: Jul 19 2018 10:31PM | Last Updated: Jul 19 2018 9:59PMपुणे : प्रतिनिधी

गेले 7-8 दिवस नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) राज्यातील काही ठिकाणांना झोडपून काढल्यानंतर त्याचा जोर गुरुवारी काहीसा ओसरला. कोकण, घाटमाथ्यावर हलका पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाच्या किरकोळ स्वरूपाच्या सरी पडल्या. मराठवाड्यात मात्र पावसाची नोंद झाली नाही. येत्या 24 तासांत सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या अरबी समुद्रालगत समांतर कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत असून, त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, राज्याच्या जवळ चक्राकार वारे पोहोचल्यास राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरी 30 मि.मी., मुंबई 20 मि.मी., महाबळेश्‍वर 90 मि.मी., कोल्हापूर 10 मि.मी. पावसाची नोंद झाली.