Tue, Mar 19, 2019 15:41होमपेज › Konkan › आमदार नाईक यांची ‘दुकानदारी’ जनताच बंद पाडणार

आमदार नाईक यांची ‘दुकानदारी’ जनताच बंद पाडणार

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 11:01PMकणकवली : शहर वार्ताहर 

स्वाभिमान पक्ष हा सामाजिक बांधिलकी जोपासत जनतेची सेवा करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष आहे. परंतू लोकशाही माध्यमाचा वापर करून कुटुंबाची रोजीरोटी चालविण्यासाठी नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आ.वैभव नाईक हे चालवित आहेत. त्यांची प्रवृत्ती दुकान थाटण्याचीच आहे. त्यामुळे स्वतः दुकान चालवणार्‍यांना ‘स्वाभिमान’चे सेवाकेंद्र दुकानच वाटणार. 2019 मध्ये वैभव नाईक यांची कुडाळ-मालवण मतदार संघातील दुकानदारी जनताच बंद पाडणार आहे,असे प्रत्युत्तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आ. वैभव नाईक यांच्या टीकेला दिले.

स्वाभिमानची दुकानदारी शिवसेनाच बंद करणार, अशी टीका आ. वैभव नाईक  केली होती. त्याला सतीश सावंत यांनी मंगळवारी प्रत्युतर दिले. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नगरसेवक समीर नलावडे उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, स्वत:च्याच घरात नगरसेवक पदे, कुडाळ, मालवण मधील ठेकेदारी स्वत:च्याच घरात घेऊन वैभव नाईक आपली रोजी रोटी चालवत आहेत. त्यांनी आधी आपला मतदारसंघ सांभाळावा, मग आमच्या सेवा केंद्रावर टीका करावी. 2014 च्या निवडणुकीत खोटी आश्‍वासने देऊन निवडून आलेल्या वैभव नाईक यांनी मच्छिमारांचे प्रश्‍न, विकासाचे प्रश्‍न मार्गी लावलेले नाहीत. स्वाभिमान पक्षात लोकशाही सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे़. त्या सेवा केंद्रात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांनी तातू राणे ट्रस्टच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम गेली 25 वर्षे सुरू ठेवले आहेत़. त्यामुळे दुकानदारी कोणाची व सेवा केंद्र कोणाचे हे जनताच  आगामी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत ठरवेल, असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला़ आ.नितेश राणे यांनी कणकवली शहरातील वाढत्या चोर्‍या व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर नियंत्रण आणण्यासाठी स्वत:च्या खिश्यातून 22 लाख खर्च करून सीसीटीव्ही बसविले. पण आ. वैभव नाईक यांनी एक रूपया तरी खर्च करून कुठले काम केले असेल तर त्यांनी दाखवावे़.शासनाच्या पैशातून काम करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे़. त्यामुळे शासनाचा पैशावर आपला तोरा मिरवू नये. या उलट आ. नितेश राणे यांनी विविध खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून डिजिटल शाळा, सार्वजनिक विकास करण्याचे उपक्रम महिंद्रा कंपनी, टाटा ट्रस्ट व अन्य खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून जोरदार कामे सुरू केलेली आहेत़. ज्या सीसीटीव्हींच्या केबल अज्ञातांकडून तोडल्या जात आहेत. त्या तोडणार्‍यांविरूध्द पहिल्यांदा कारवाई करून दाखवावी़. कारण तुमचेच पालकमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत़.

राणे कुटुंबीय गेली अनेक वर्षे सातत्यपुर्वक स्वत:च्या खिश्यातून सामाजिक उपक्रम करीत आहेत़  कणकवलीत सीसीटीव्ही लावले जाणार असतील. तर ते निवडणुकीपूर्वी लावा़  त्यामुळे खरे दहशत करणारे चेहरे जनतेसमोर येतील़.दहशतवादाचा बागुलबुवाकरून निवडून जिंकण्यासाठी विरोधक सातत्याने षडयंत्र राबवित आले आहेत़. गृहखाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदा खून, चोरी या प्रकरणांचे तपास लावावेत़ सिंधुदुर्गात येणार्‍या कलाकारांची तपासणी करण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी पोलिस दलात चांगले काम करून दाखवावे, असा उपरोधिक टोला सतीश सावंत यांनी लगावला.