Thu, Feb 21, 2019 23:22होमपेज › Konkan › महाडमध्ये छेडछाड करणार्‍या परप्रांतीयास बेदम मारहाण

महाडमध्ये छेडछाड करणार्‍या परप्रांतीयास बेदम मारहाण

Published On: Mar 17 2018 12:21PM | Last Updated: Mar 17 2018 12:21PMमहाड : प्रतिनिधी

महाड शहरातील अल्‍पवयीन मुलींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगाराला जमावाने पकडून बेदम मारहाण केली. शहरातील उभा मारूती काकरतळे परिसरातून शाळेतून येणार्‍या मुलींची तो छेढ काढत होता. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तो येथे आला आहे. महाड येथील उभा काकरतळे परिसरातून शाळकरी मुली घरी जात असताना त्या दोन मुलींची छेड काढण्याचा प्रयत्‍न केला.यावेळी तेथे असणार्‍या नागरिकांनी त्याला जाब विचारला तेव्‍हा त्याने उद्धट उत्तर देऊन पळून जाण्याचा प्रयत्‍न केला.

यावेळी जमलेल्या जमावाने त्याला पकडून बेदम मारहाण केली. यानंतर महाड शहर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.