Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Konkan › परप्रांतीय मच्छीमार बोटी गस्तीपथकाच्या रडारवर!

परप्रांतीय मच्छीमार बोटी गस्तीपथकाच्या रडारवर!

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 10:03PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

परप्रांतीय मच्छीमार बोटी त्यांच्या सागरी क्षेत्रातील मासळी घटल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारी मासेमारीसाठी येऊ लागल्या आहेत. या बोटी राज्याच्या समुद्र क्षेत्रात येऊ नयेत, यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त विभागाच्या गस्ती पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. याचाच परिणाम म्हणून गुरुवारी गुजरातच्या दोन बोटी पकडल्या. त्यापूर्वी केरळची एक बोट पकडली होती. 

दि. 1 जानेवारीपासून पर्ससीन, मिनी पर्ससीन बोटींचा मासेमारी बंदीकाळ सुरू झाला. या काळात गेल्या दोन वर्षांपासून शाश्‍वत मासेमारी आणि पर्ससीन मासेमारी करणार्‍यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री उडत आहे. यामध्ये पर्ससीन मासेमारीला मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागत आहेत. अशावेळी पर्ससीन नेट मासेमारी करणार्‍यांकडून परप्रांतीय मासेमारी करणार्‍या बोटींवर निशाणा साधला जाऊ लागला.